शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परस्त्रीला वश करण्यासाठी त्यानं घुबड मारलं, पण विपरीत घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 09:17 IST

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला अटक

ठळक मुद्देघुबडाचा बळी देणाऱ्या व्यक्तीला अटकपरस्त्रीला वश करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी घुबडाचा बळीदिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: माणूस अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यावर तो माणूस राहात नाही, असं म्हणतात. दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये याचाच प्रत्यय देणारी घटना घडली आहे. परस्त्रीला वश करण्यासाठी एका विवाहित व्यक्तीनं दिवाळीत एका घुबडाचा बळी दिला. यामुळे परस्त्री आपल्या कह्यात येईल, असं त्या व्यक्तीला वाटलं होतं. मात्र तसं काहीच घडलं नाही. उलट घुबडाचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या वडिलांचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. परस्त्रीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी विवाहित व्यक्तीनं मंत्र-तंत्राचाही आधार घेतला. विशेष म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतरही संबंधित व्यक्ती दररोज रात्री विचित्र क्रियाकर्म करायची. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना भीती वाटू लागली. त्यांनी याबद्दलची तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घरी रविवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी त्यांना एक घुबड मृतावस्थेत कूलरमध्ये सापडलं. घुबडाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव कन्हैया असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली. त्याचं वय 40 वर्ष असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो पत्नी आणि तीन मुलांसह सुल्तानपुरीतील सी ब्लॉकमध्ये राहतो. घुबड्याचा बळी दिल्यावर महिलेला वश करता येतं. याशिवाय धनप्राप्तीदेखील होते, असं कन्हैयाला त्याच्या एका नातेवाईकानं सांगितलं होतं. त्याच नातेवाईकाकडून कन्हैयानं घुबड आणलं होतं. त्या नातेवाईकाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :delhiदिल्ली