शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

साधूच्या वेशात सैतान! हात जोडले, दान मागतिले अन् माजी खासदारावर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:41 IST

तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशातील माजी खासदार शेषगिरी राव यांच्यावर गुरुवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला.

हैदराबाद: तेलुगू देसम पक्षाचे (TDP) ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशातील माजी खासदार शेषगिरी राव यांच्यावर गुरुवारी सकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या घराबाहेरच हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर साधूच्या रूपात आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हल्लेखोराने आधी माजी खासदाराकडे दान मागितले आणि अचानक राव यंच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो फरार झाला आहे. टीव्हीने9 हिंदीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

शेषगिरी राव हल्ल्यानंतर आंध्र प्रदेशातील तुनी शहरात त्यांच्या घराबाहेर जखमी अवस्थेत पडले होते. काही वेळाने घरात उपस्थित लोकांनी त्यांना पाहिले आणि तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सध्या ते काकीनाडा येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्हा दाखल, हल्लेखोराचा शोध सुरू पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवून पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी हल्लेखोर साधूचे कपडे परिधान करून राव यांच्या घरी पोहोचला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेल्याचे लोकांचे म्हणणे आहे. राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच टीडीपी नेते आणि कार्यकर्ते सर्वजण रुग्णालयात पोहोचले. त्याठिकाणी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. हल्लेखोराला लवकर पकडण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Telugu Desam Partyतेलगू देसम पार्टीMember of parliamentखासदारCrime Newsगुन्हेगारी