शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही वाचला; पोलीस येताच 'पापा आ गये' म्हणत उठला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:12 IST

आश्चर्यजनक घटना पाहून पोलीस अवाक्

भोपाळ: अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही जीव वाचल्याची आश्चर्यजनक घटना मध्य प्रदेशात घडली. अशोक नगर भागात एक व्यक्ती रेल्वे रुळांवर झोपला होता. त्यावेळी त्याच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तीन ट्रेन गेल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी पोलिसांची समजूत झाली. मात्र पोलिसांना पाहताच रुळावर झोपलेली व्यक्ती उठली आणि 'पापा आ गये' म्हणू लागली. अंगावरुन तीन ट्रेन जाऊनही एखादी व्यक्ती वाचण्याची शक्यता अतिशय कमी असते. मात्र मध्य प्रदेशच्या अशोक नगरमध्ये हा आश्चर्यजनक प्रकार घडला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह पायलटनं रेल्वे रुळांवर एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित व्यक्तीच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या होत्या. त्यामुळे रुळावरील व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांना वाटलं. मात्र पोलिसांना पाहताच रुळावर पडलेली व्यक्ती 'पापा आ गये' म्हणत ओरडू लागली. पोलिसांना संबंधित व्यक्तीची चौकशी करताच त्याचं नाव धर्मेंद्र असल्याचं समजलं. धर्मेंद्र मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे तो रेल्वे रुळांवर कधी झोपला हे त्यालादेखील आठवत नव्हतं. त्याच्या अंगावरुन तीन ट्रेन गेल्या याची त्याला कल्पनादेखील नव्हती. त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी देताच धर्मेंद्र शुद्धीवर आला. तो अशोक नगर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे रुळांवर झोपला होता. धर्मेंद्रला वैद्यकीय तपासणीनंतर घरी पाठवण्यात आलं.