शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 17:09 IST

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे.

कोलकाता, दि. 17 - पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. सर्वच्या सर्व सात महापालिकांमध्ये तृणमुलने काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपा या निवडणुकीत दुस-या स्थानावर असून, डावे थेट तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तीन महापालिकांमध्ये भाजपाने सहा जागा जिंकल्या आहेत. 

उत्तर बंगालमधील धुपगुरी येथे चार, बुनियादपूर आणि पानस्कुरामध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तृणमुलने बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर महापालिकेत सर्वच्या सर्व 43 वॉर्डमध्ये विजय मिळवला. हलदीया महापालिकेत तृणमुलने सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. महापालिका क्षेत्रात भाजपाला मिळालेले यश हे आगामी काळात तृणमुलसमोर भाजपाचे आव्हान उभे राहणार असल्याचे संकेत आहेत असे निवडणूक विश्लेषकांनी सांगितले. 

आणखी वाचा दिल्लीला जात नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीससैन्य मागे घेतले तरी भारताला सोडणार नाही - चीन

या निवडणुकीत काँग्रेसला एक जागाही जिंकता आली नाही. हल्दीया महापालिका डाव्यांचा गड होता. पण तृणमुलने इथे सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. धुपगुरीमध्ये तृणमुलने 12 तर, भाजपाने चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत तृणमुलची मते कमी न होता उलटी वाढली आहेत.  डाव्यांचा जो जनाधार होता तो भाजपाकडे झुकतोय हे या निवडणूकीतून दिसले असे तृणमुलचे नेते गौतम देब यांनी सांगितले. तृणमुलने ही निवडणूक जिंकण्यासाठी धन आणि मसल पावरचा उपयोग केला असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. 

निवडणुकीच्या या निकालातून भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये जनाधार तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कट्टर विरोधक आहेत.  त्यांनी अऩेक मुद्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

नोटाबंदी निर्णयामुळे देश जाणार १०० वर्ष मागे - ममता बॅनर्जी नोटाबंदीमुळे जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आणीबाणीच्यावेळीही नव्हती. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय देशाला १०० वर्ष मागे घेऊन जाणारा आहे अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर प्रहार केला होता.  

दिल्लीच्या आजादपूरमध्ये त्यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त जनसभा घेत या निर्णयाचा निषेध केला. यावेळी ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांवर व्यक्तीगत टीकाही केली. मोदीजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उद्या गुप्त मतदान घेतले तर, तुम्हाला तुमचा स्वत:चा पक्ष आणि  कुटुंबियही मतदान करणार नाहीत असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.