शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी ६५ लाख रुपयांची सुपारी? विद्यार्थ्याला मेसेज, पोलिसांनी केला तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:08 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी आपणास देऊ केली होती, असा धक्कादायक दावा १९ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी आपणास देऊ केली होती, असा धक्कादायक दावा १९ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.आपणास सोमवारी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी एक लाख डॉलर्स (सुमारे 65 लाख रुपये) ची आॅफर देण्यात आली होती, असे मुर्शिदाबादमधील बेहरामपूर येथे राहणाºया विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले आहे. ज्या मोबाइल नंबरवरून हा मेसेज आला, तो अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.त्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मला पहिला मेसेज आला. आपण स्वत: लॅटिन असल्याचे सांगत होता. आपण एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून, भारतामध्ये जोडीदाराचा शोध घेत आहोत, असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. तुला या कामाासाठी १ लाख डॉलर्स देण्यात येतील. तू पूर्णत: सुरक्षिात राहशील. त्याची जबाबदारी आम्ही घेऊ , तू काळजी करु नकोस. तू तयार आहेस का, एवढे मात्र कळव असेही मेसेजमध्ये लिहिले होते.दुसºयांदा पुन्हा सुमारे पावणेतीनच्या सुमारात पुन्हा मेसेच आला. तू पराभवी मनोवृत्तीचा आहेस, असा तेव्हाच्या मेसेजमध्ये होेत. नंतर साडेतीन वाजता पुन्हा मेसेज आला. त्यात संबंधित इसमाने आपण भारतात येण्याची योजना आखत असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर या विद्यार्थ्याने आपल्या देशावर आपले प्रेम आहे. त्याचा नाश आपण पाहू शकत नाही, असे उत्तर दिले. पण आम्हाला भारताचा नाश करायचा नसून, केवळ एका व्यक्तीला संपवायचे आहे, असे संबंधित इसमाने कळवले.फोन बंद ठेवण्याचा सल्लाया प्रकारानंतर मी पोलीस ठाण्यात जाण्याचा आणि या प्रकाराची माहिती देण्याचा निर्णय घेतला. मी पोलीस ठाण्यात जात असताना पुन्हा मला एक मेसेज आला. त्यात तू पोलीस ठाण्याकडे निघाला आहेस, असे तुझे लोकेशन मला दिसत आहे. तुझ्यावर आमची नजर आहे. आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस, अन्यथा तुझीही हत्या केली जाईल, असा मेसेज मला आला, असे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला त्याचा मोबाइल फोन बंद करण्याचा सल्ला दिला आहे. कोलकाता पोलिसांनी हा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारत