शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कोसळत्या तंबूतही मोदींना दिसला ममतांच्या सत्तेचा अस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:33 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी सकाळी येथे झालेल्या ‘कृषी कल्याण सभे’त श्रोत्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून उभारलेला एक तंबू कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ९० जण जखमी झाले.

मिदनापूर (प. बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी सकाळी येथे झालेल्या ‘कृषी कल्याण सभे’त श्रोत्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून उभारलेला एक तंबू कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ९० जण जखमी झाले. यापैकी डोक्याला जबर मार लागलेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.वास्तविक हा अपघात होता. पण मोदींनी त्याचेही राजकारण केले. सभेतील गडबड गोंधळ थोडा शमल्यावर मोदी म्हणाले, आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही. सभेला आलेल्यांपैकी एक तृतियांश लोक कोसळलेल्या तंबूखाली दबले जाऊनही इतर श्रोत्यांनी न घाबरता शांतपणे बसून राहावे, याची कल्पनाही करता येत नाही.अशा संकटकाळीही लोकांनी दाखविलेले धैर्य हे प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचा अस्त जवळ आल्याचे द्योतक असल्याचे सूचवत मोदी म्हणाले, या घटनेवरून लोकांची शिस्त व शक्ती दिसून येते. नैसर्गिक आपत्तीतही न डगमगणारे हे लोक ममतांच्या धाकदपटशालाही भीक घालणार नाहीत.मोदींची घोषणाबाजीमोदींचे भाषण सुरू असतानाच हा अपघात घडला. मोदींनी तंबूतील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. इतर लोकांनीही घाबरून जाऊन धावाधाव करून नये यासाठी मोदींनी दोन-चार घोषणा द्यायला लावून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले, तसेच सुरक्षेसाठी मागे उभ्या असलेल्या एसपीजी कमांडोंनाही मोदींनी कोसळलेल्या तंबूकडे जाण्याच्या सूचना केल्या. >..अन् लोखंडी पाइपचा सांगाडा अचानक कोसळलागेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने मिदनापूर कॉलेजिएट मैदानावर सभेला येणाऱ्या लोकांना आडोसा मिळावा, यासाठी लोखंडी पाइपांच्या सांगाड्यावर छत म्हणून ताडपत्रीवजा कापड ताणून बांधून तंबू उभारण्यात आले होते. यापैकी एका तंबूत श्रोत्यांची खूप गर्दी झाली. काही उत्साही श्रोते समोरचे चांगले दिसावे यासाठी तंबूच्या लोखंडी सांगाड्यावर चढले. त्यातच जोरदार पाऊस आणि वारा आला आणि हा तंबू कोसळला.हे सर्व अचानक घडल्याने तंबूखाली दबले गेलेले श्रोते बाहेर पडण्यासाठी उठून धावू लागले. त्यातून नंतर चेंगराचेंगरी झाली. ९० हून अधिक लोक जखमी झाले. त्यात बहुतांश महिला होत्या. अनेक जण घुसमटून बेशुद्ध झाले.>ममतांचे टिष्ट्वटममता बॅनर्जी यांनी लगेच टिष्ट्वट करून या घटनेतील जखमींना लवकर बरे वाटावे अशी कामना केली आणि राज्य सरकार त्यांच्यावर संपूर्ण उपचार करेल, असे सांगितले.>विचारपूर करण्यासाठी इस्पितळात गेलेल्या मोदींनी जखमी तरुणीला स्वाक्षरी देऊन तिची इच्छा लगेच पूर्ण केली. हा फोटो नंतर व्हायरल झाला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी