शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Mamata VS CBI: "ममता डाकू अन् चोरांचा बचाव करतायत", ममतांच्या पाठिंब्यावरून दोन गटांत विभागली काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 10:50 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेला आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेलाममतांच्या समर्थनावरूनच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत.

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेला आहे. या वादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु ममतांच्या समर्थनावरूनच काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अधीर रंजन चौधरी यांनी हे विधान केलं आहे. ममता बॅनर्जी चौकशीला घाबरतायत, या घोटाळ्यात टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांची नावं आहेत. अधीर रंजन म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून चौकशी केली जात आहे. परंतु ममता बॅनर्जी डाकू आणि चोरांबरोबर उभ्या आहेत. हे कसलं राज्य आहे, जिथे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करत आहेत. पक्ष नेतृत्वाचं वेगळं मत असलं तरी ममता बॅनर्जी या चुकीच्या आहेत. कारण त्या त्यांच्या डोळ्यांनी पश्चिम बंगालमध्ये चुकीच्या घटना होताना पाहत असतात. काल रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मोदी, अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी बंगालमधील लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्याचे कारस्थान रचल्याचा त्यांच्यावर आरोप केला.भाजपाने मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तपासासाठी आलेल्या सीबीआयला रोखून ममता राजकीय लाभ मिळविण्याचे स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागRahul Gandhiराहुल गांधी