शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या धक्क्यानंतर ममतांच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 10:55 IST

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक काल भाजपात सामील झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये फेरबदल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला परिणाम लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला उत्तर बंगाल आणि जंगलमहल परिसरात यश मिळवता आले नाही. यातच, या भागातून निवडून येणारे विनोय कृष्णा वर्मन आणि शांतिराम महतो यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तर सुब्रता मुखर्जी, शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी आणि ब्रात्या बसू यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.  

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,'पश्चिम बंगालमध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होतील. सध्याचे सरकार 2021 पर्यंत टिकणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडीच्या दबावाखाली चालत आहे.' 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

ममता बनर्जी यांच्या जवळचे नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. तर, कालच तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांच्यासह 50 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सीपीएमचे आमदार विधायर देवेंद्र रॉय सुद्धा भाजपात सामील झाले आहेत.   

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019west bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९