शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"ममता बॅनर्जी या बंगालच्या किम जोंग उन", गिरीराज सिंहांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:11 IST

Giriraj Singh on Mamata Banerjee : गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली.

Giriraj Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह यांनी ममता  बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगाल सरकारवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते तुकडे तुकडे गँग ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. त्यामुळेच त्या असंवैधानिक गोष्टी बोलत आहेत. फेडरल स्ट्रक्चर तोडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि लालू यादव उभे आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले. 

याचबरोबर, गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावरही आक्षेप घेतला. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले आहे, ते लोकशाहीवादी व्यक्तीचे असू शकत नाही. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांची वागणूक उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखीच आहे. किम जोंग उन यांना विरोधी पक्ष जसा आवडत नाही, तसाच ममता बॅनर्जी यांनाही विरोधी पक्ष आवडत नाही, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 

दरम्यान, आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. नुकतेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "लक्षात ठेवा, बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही जाळपोळ होईल". ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. पत्रात सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे राज्यात अशांतता निर्माण होण्याची भीती सुकांत मजुमदार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा