शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 18:29 IST

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे सेन म्हणाले. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी हा दावा केला आहे. त्याच वेळी, ते म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने एकतर्फी होतील असा विचार करणे चूक असेल. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे ते म्हणाले. 

“मला वाटते की प्रादेशिक पक्षांची भूमिका स्पष्टपणे महत्त्वाची आहे. मला वाटतं द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष आहे, टीएमसी नक्कीच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचाही काही प्रभाव आहे, पण तो वाढवता येईल की नाही हे मला माहीत नाही. भाजपची जागा दुसरा कोणताही पक्ष घेऊ शकत नाही हे नाकारणं चूक ठरेल. त्यांनी स्वतःला अशा पक्षाच्या रुपात समोर आणलंय, ज्याचा देशाच्या इतर भागांपेक्षा हिंदुंकडे अधिक कल आहे,” असे अमर्त्य सेन म्हणाले. पीटीआय भाषाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

“भाजपने भारताची दृष्टीकोन खूप कमी केला आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत या विचारसरणीला अतिशय प्रकर्षाने स्वीकारून भारताचे आकलन संकुचित केले आहे. आज भारतात भाजपचा पर्याय मांडला गेला नाही तर ते दु:खाची गोष्ट ठरेल. मला वाटते की इतर राजकीय पक्षांनी खरोखर प्रयत्न केले एक चर्चा सुरू करू शकतात,” असेही त्यांनी नमूद केले. 

ममता बॅनर्जीपंतप्रधान होणा का?यावेळी ममता बॅनर्जी या पंतप्रधान बनतील का असा सवाल करण्यात आला. “त्यांच्यात असे करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे दुसरीकडे, ममता एकसंघपणे भाजपविरोधातील जनतेतील निराशेची शक्ती खेचू शकतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही,” असे त्यांनी नमूद केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवर सेन यांनी शंका उपस्थित केली. काँग्रेस ‘कमकुवत’ झाल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की हा एकमेव पक्ष आहे जो संपूर्ण भारताचा दृष्टिकोन देऊ शकतो. काँग्रेस खूप कमकुवत झाली आहे आणि काँग्रेसवर किती अवलंबून राहू शकते हे मला माहीत नाही. दुसरीकडे, काँग्रेस निश्‍चितपणे अखंड भारताचा दृष्टीकोन देते, जे इतर कोणताही पक्ष देऊ शकत नाही. पण, काँग्रेसच्या अंतर्गतच फूट पडली आहे,” असेही सेन म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीprime ministerपंतप्रधान