शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Mamata Banerjee : "सॉरी..."; कोलकाता निर्भया प्रकरणावर ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दु:ख, मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:55 IST

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टर हत्येप्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरात निदर्शनं होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही डॉक्टरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या विरोधात देशभरात निदर्शनं होत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही डॉक्टरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी तृणमूल छात्र परिषदेचा स्थापना दिवस पीडितेला समर्पित करत आहे. आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जलद न्याय मिळण्याची आशा करतो. अमानवी घटनांना बळी पडलेल्या सर्व वयोगटातील महिलांसोबत आमची सहानुभूती आहे, सॉरी." पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे जोर दिला की विद्यार्थी आणि तरुणांची सामाजिक भूमिका मोठी आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "समाज आणि संस्कृती जागृत ठेवत नवीन दिवसाची स्वप्नं दाखवणं आणि नव्या दिवसाच्या उज्ज्वल संकल्पाने सर्वांना प्रेरित करणं हे विद्यार्थी समाजाचं काम आहे. आज मी सर्वांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करते. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, निरोगी राहा आणि उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध राहा." याच दरम्यान, भाजपाने शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ १२ तासांच्या 'बंगाल बंद'ची हाक दिली आहे.

कोलकातामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी केली मेट्रो स्टेशन बंद करण्यास सुरुवात; ७ जणांना अटक

कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रदर्शनाला 'नबन्ना अभियान' असं नाव देण्यात आलं आहे. आज बंगालमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. भाजपा बंददरम्यान नादियामध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी