शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ला पहिला तडा? ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया, केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:48 IST

INDIA Opposition Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र गेले काही महिने अडखळत घडपडत मार्गाक्रमण करत असलेल्या या आघाडीला पहिला तडा गेला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र गेले काही महिने अडखळत घडपडत मार्गाक्रमण करत असलेल्या या आघाडीला पहिला तडा गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जींना वगळून इंडिया आघाडीची कल्पना करता येणार नाही. ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भाग आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यामध्ये काही गतिरोधक येतातच. मात्र त्यातून काही ना काही मार्ग काढला जाईल.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. इथे इंडिया आघाडीतील जागावाटपामध्ये काँग्रेसने १२ जागांची मागणी केली होती. मात्र ममता बॅनर्जींनी काँग्रेसला केवळ २ जागा देऊ केल्या होत्या. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, आज सकाळी ममता बॅनर्जी यांना आपला निर्णय जाहीर करत बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. त्या म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये , आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल