शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींना पाठवली 11 कोटींची नोटीस, आणखी 3 नेते रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:43 IST

Mamata Banerjee : 8 महिने जुने प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल, यांच्यात पुन्हा तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस, यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तृणमूल नेत्यांनी राज्यपालांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तातडीने माफी मागितली नाही, तर 11-11 कोटी रुपयांचा मानहानीचा दंड ठोठावला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तृणमूलच्या आमदार सायंतिका बॅनर्जी आणि रयत हुसैन सरकार, यां ही नोटीस पाठवण्यात आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना बदनामीची नोटीस पाठवली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?मे 2024 मध्ये बंगाल विधानसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणुका झाल्या, ज्यामध्ये बारानगर जागेवरून सायंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला जागेवरून रयत सरकार विजयी झाले. दोन्ही आमदारांच्या शपथविधीबाबत अडचण निर्माण झाली होती. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना शपथ घेण्याचा अधिकार दिला नाही. त्या दोघांनाही उपसभापतींनी शपथ देण्यास सांगितले.  पणष या दोन्ही आमदारांनी राजभवनात जाऊन शपथ घेण्यास नकार दिला.

राजभवन सुरक्षित नसल्याचा दावा या आमदारांनी केला. हा संपूर्ण प्रकार घडत असताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनाबाबत गंभीर टीका केली होती. राजभवनात महिला सुरक्षित नसल्याचे ममता म्हणाल्या. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने ममतांना राजभवनाबाबत अशी टिप्पणी करू नये, असे सांगितले होते. या घटनेदरम्यान दोन्ही आमदारांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले होते, ज्यासाठी आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका