शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मल्ल्याची ६६३० कोटींची आणखी मालमत्ता जप्त!

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती विजय मल्ल्याची ६६३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे शनिवारी आदेश दिले. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातील

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती विजय मल्ल्याची ६६३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे शनिवारी आदेश दिले. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातील ईडीचा हा दुसरा आदेश आहे. यात मल्ल्याच्या अलिबागजवळच्या २५ कोटी रुपये किमतीच्या फार्म हाउसचा समावेश आहे. हवाला व्यवहारप्रकरणी ईडीने मल्ल्या आणि त्यांच्या साथीदारांचे फार्म हाऊस, फ्लॅट आणि मुदतठेवी जप्त केल्या आहेत. ईडीने अलीकडेच तपासाची व्याप्ती वाढवीत बँकांकडून घेतलेले ६०२७ कोटी रुपयांच्या कर्जाची फेड न केल्या प्रकरणाचीही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) तपास करीत आहे. सीबीआयने गेल्या महिन्यात याबाबत नवा एफआयआर दाखल केला. त्यानंतर मल्ल्याविरुद्धची ही पहिली कारवाई आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत ८०४४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी १४११ कोटी रुपये मूल्यांची मालमत्ता जप्त केली होती. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी जारी करण्यात आलेल्या अंतरिम जप्ती आदेशातहत ईडीने अलीबागच्या मांडवा येथील २५ कोटी रुपयांचे फार्म हाऊस, बंगळुरू येथील किंगफिशर टॉवरमधील ५६५ कोटी रुपये मूल्याचे अनेक फ्लॅट, बँकेतील १० कोटी रुपयांच्या मुदतठेवी, तसेच यूएसएल, युनायटेड ब्रेवरीज लि., मॅकडोवेल होल्डिंग कंपनीचे ३६३५ कोटी रुपये मूल्यांचे शेअर्स जप्त केले आहेत. या कंपन्यांत मल्ल्या व यूबीएचएल, तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील प्रतिष्ठांनाची संयुक्तरीत्या भागीदारी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)गुन्हेगारी कटाचा ईडीचा आरोप- मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. मार्चमध्ये भारतातून पळून गेल्यानंतर तां सध्या लंडनमध्ये राहत आहेत. सरकारने त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. - मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्स, तसेच युनायटेड ब्रेव्हरिज होल्डिंग लि. यांच्याशी हातमिळवणी करून गुन्हेगारी कट रचला आणि बँकेच्या गटाकडून कर्ज मिळविले, असा ईडीचा आरोप आहे. बँकांना अंधारात ठेवले...या रमकेपैकी ४९३०.३४ कोटी रुपयांची मुद्दल रक्कम अद्यापही परत केलेली नाही. याशिवाय मल्ल्याने स्वत:च्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखालील कंपन्यांच्या नावे शेअर मिळविले. किंगफिशर एअरलाईन्सचा प्रवर्तक मल्ल्या आणि यूएचबीएल यांच्याकडे पुरेसा पैसा होता; मात्र त्याला कर्जाची परतफेड करायची नव्हती, असे दिसते. त्याने ३६०० कोटी रुपयांचे शेअर्स युटीआय इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस लि. यांच्याकडे परस्पर गहाण ठेवले होते. याबाबत कर्ज पुरवठादार बँकांना कल्पना देण्याऐवजी त्यांना त्याने अंधारात ठेवले, असे ईडीच्या आदेशात म्हटले आहे. 4234.84कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या संपत्तीचे सध्याचे बाजार मूल्य ६६३० कोटी एवढे आहे.