शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खरगे अध्यक्षपदी अन् नितीश कुमारांचा हिरमोड, पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायचे होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:42 IST

Nitish Kumar: भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

नवी दिल्ली - भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असा नितीशकुमार यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच त्यांनी इंडिया आघाडीला आकार देण्याचा प्रयत्न केला. आघाडीचे नेतृत्व नितीशकुमार यांना करायचे होते. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही त्यांना जनतेसमोर येण्याची इच्छा होती. मात्र, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड होणार असल्याचे कळताच नितीशकुमार यांचा हिरमोड झाला. त्यांनी त्या दिवशीच इंडिया आघाडीपासून सर्व संबंध तोडले.

ते जाणार होते तरीही..राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना केलेले तीन दूरध्वनी त्यांनी उचलले नाहीत. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह हे नितीशकुमार यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते. मात्र, त्यांच्याशी बोलणी करण्यास त्यांनी नकार दिला. ते इंडिया आघाडीला रामराम ठोकून एनडीएमध्ये जाणार हे निश्चित झाल्यानंतरही काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीशकुमारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीशकुमार यांनी या दोघांना काहीही प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार