शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:57 IST

सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत.

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर आणि यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली. सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ही शपथ राज्यनिहाय खासदारांना दिली जात आहे. 

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे खासदारांना शपथ देत आहेत. दरम्यान, विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन निषेध केला.याचबरोबर, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून इंडिया आघाडीचे खासदार नाराज आहेत. याबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, संसदेच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष हा मुद्दा कधीच नव्हता. आम्ही संविधान आणि नियमानुसार काम करतो. सर्व सदस्यांनी मिळून संसद चालवायची आहे. 

२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी सहकार्याचे आवाहन करताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोठं विधान केले आहे.

संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान किती दिवस हे बोलत राहतील, कुणास ठाऊक. त्यांच्याकडे आणीबाणीशिवाय बोलायला काहीच नाही. जे होते, ते घोषित केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ती अनसेड इमर्जन्सी (अघोषित आणीबाणी) आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज येथे आंदोलन करत आहोत.प्रत्येक लोकशाही नियम मोडला जात आहे, म्हणूनच आज आम्ही मोदीजींना संविधानाचे पालन करण्यास सांगत आहोत. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?विरोधकांवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, "उद्या २५ जून आहे. ५० वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानावर काळा डाग लागला होता. अशी काळ देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांची भारतातील लोकशाही परंपरांवर निष्ठा आहे. त्यांच्यासाठी २५ जून हा दिवस अविस्मरणीय आहे. राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवी पिढी कधीही विसरणार नाही. भारताचे तुरुंगात रूपांतर झाले. लोकशाही पूर्णपणे दाबली गेली. आणीबाणीची ही ५० वर्षे ही प्रतिज्ञा आहे की आपण आपल्या राज्यघटनेचे रक्षण करू आणि भारताच्या लोकशाही परंपरांचे रक्षण करू, तर देशवासीय संकल्प करतील की भारतात पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत कोणीही करणार नाही."

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा