शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मलिक म्हणाले, ‘ते माझे वैयक्तिक मत’ वादग्रस्त विधानानंतर घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 03:04 IST

वादग्रस्त वक्तव्यावरील गदारोळानंतर विधान योग्य नसल्याची कबुली

श्रीनगर : काश्मीरला लुटणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले पाहिजे, असे विधान राज्यपाल या पदावरील व्यक्तीने करणे योग्य नाही; पण संताप, उद्वेगातून मी ते केले. ते माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी केला.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानामुळे गदारोळ माजल्यानंतर दुसºया दिवशी आपली भूमिका सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये अनेक राजकीय नेते, नोकरशहा हे कमालीचे भ्रष्ट आहेत. ते गुन्हेगार आहेत. त्यांच्याविषयी संताप व्यक्त करताना राज्यपाल म्हणून मी संयमाने बोलणे आवश्यक होते. मात्र, एक व्यक्ती म्हणून विचाराल, तर मी जे बोललो तेच माझे खरे मत आहे.

कारगिल लडाख पर्यटन महोत्सवाचे उद््घाटन सत्यपाल मलिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या दहशतवादी युवकांनी हातात बंदुका घेतल्या आहेत ते निरपराध लोकांना, पोलीस अधिकाऱ्यांना मारतात. तुम्ही या लोकांना का मारत आहात? अशांना मारा ज्यांनी तुमच्या काश्मीरची सारी दौलत लुटली आहे. या भ्रष्टाचारी लोकांपैकी एकाला तरी कधी तुम्ही मारले आहे का?

काश्मीरमध्ये आजवर ज्या घराण्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्याकडे अमर्याद संपत्ती आहे. त्यांचे काश्मीरमध्ये एक घर आहे तर दिल्ली, दुबई व लंडनमध्येही त्यांनी घरे विकत घेतली आहेत. काश्मीरमध्ये पूर्वी मंत्रीपद उपभोगलेल्यांपैकी दोन-तीन महत्त्वाच्या व्यक्ती जामिनासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत धावपळ करताना दिसतील. त्यावेळेला तुम्ही माझी तारीफच कराल. काश्मीरमधील राजकारणी दुतोंडी आहेत. दिल्लीमध्ये ते आमच्याशी हसतखेळत चर्चा करतात. काश्मीरमध्ये मात्र जनतेची माथी भडकवितात, असा आरोपही त्यांनी केला. 

हे आवाहन भयावहसत्यपाल मलिक यांच्यावर टीका करताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राजकारणी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांना ठार मारण्याचे आवाहन राज्यपालांनी दहशतवाद्यांना करणे भयावह आहे.बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी दुसºयांना प्रोत्साहन देणाºयांनी स्वत:ची प्रतिमा दिल्लीत कशी आहे, हे आधी तपासून पाहावे. त्यावर ओमर अब्दुल्ला हे बालिश राजकारणी असल्याचा टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर