शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 04:32 IST

खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मागितली होती परवानगी

मुंबई : मध्य प्रदेशमधील भाजपची नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. प्रकृती आणि खासदारकीचे कामकाज करता यावे, यासाठी तिने खटल्यास गैरहजर राहण्याची मुभा मागितली होती.प्रज्ञासिंहला अनेक आजार आहेत. या आजारांमुळे न्यायालयात उपस्थित राहण्याच्या स्थितीत नाही, असे प्रज्ञासिंहने अर्जात म्हटले आहे. ‘मी साध्वी असल्याने माझ्या साधनेकरिता मला कडक नियम पाळावे लागतात. तसेच खाण्यापिण्याचे पथ्यही पाळावे लागते. या सर्वांचा विचार करता मला प्रत्येक आठवड्याला भोपाळ ते मुंबई असा प्रवास करणे शक्य नाही,’ असेही तिने अर्जात नमूद केले आहे. मध्य प्रदेशची खासदार असल्याने आपण न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही. तसेच पक्षादेशानुसार, सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात एकही दिवस गैरहजर राहण्याची मुभा नाही. त्यामुळे किमान लोकसभा अधिवेशन संपेपर्यंत खटल्यास अनुपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती तिच्या वकिलांनी केली.खटल्यास अनुपस्थित राहण्यासाठी दिलेल्या सबबी पुरेशा नाहीत आणि त्या खऱ्याही नाहीत, असे म्हणत विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. व्ही.ए. पडाळकर यांनी प्रज्ञासिंहचा अर्ज फेटाळला. मात्र, तिच्या सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारच्या सुनावणीत तिला अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. गेल्या सुनावणीत प्रज्ञासिंहने कोर्टरूम स्वच्छ नसल्याने घातलेल्या गोंधळाची न्यायाधीशांनी दखल घेत म्हटले की, प्रज्ञासिंह ठाकूरने गेल्या सुनावणीत म्हटले की, कोर्टरूम स्वच्छ नाही, मानवता दाखवत न्यायालयाने तिला वारंवार खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यास तिने नकार दिला. तिने केलेल्या विधानांत तथ्य नाही. न्यायालयाच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे, याकडे तिचे लक्ष गेले नाही का?कागदपत्रे दिली नाहीत‘संसदेत उपस्थित राहणे आणि पक्षादेशाचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, पक्षादेशासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली नाहीत,’ असे न्यायाधीशांनी प्रज्ञासिंहचा अर्ज फेटाळताना म्हटले.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा