शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारताला 'पॉवर'फुल्ल झटका; मोदींचा मैत्रीचा हात झटकत मालदीवची पाकिस्तानला साथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 12:38 IST

फेब्रुवारी महिन्यात मालदीवमध्ये राजकीय संकट उद्भवलं होतं. तेव्हापासूनच, मालदीव सरकार भारताला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तान या दोन त्रासदायक शेजाऱ्यांशी लढण्यासाठी मालदीवची मदत घेण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठा हादरा बसला आहे. भारतीयांना 'वर्क परमिट' देणं बंद करणाऱ्या, भारतानं दिलेली हेलिकॉप्टर परत करून टाकणाऱ्या मालदीव सरकारने पाकिस्तानसोबत ऊर्जाविषयक करार करून मैत्रीचं नवं पर्वच सुरू केलंय. त्यांचं हे 'पॉवर कनेक्शन' मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतं. 

फेब्रुवारी महिन्यात मालदीवमध्ये राजकीय संकट उद्भवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राजकीय कैद्यांची सुटका करण्यास राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी नकार दिला होता. उलट, १५ दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. तेव्हापासूनच, मालदीव सरकार भारताला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. याउलट, ते चीन आणि पाकिस्तानसोबत हातमिळवणी करताना दिसताहेत. मालदीव सरकारच्या स्टेलको विद्युत कंपनीचे अधिकारी गेल्या आठवड्यात पाकिस्तानात गेले होते. तिथे त्यांनी ऊर्जाविषयक सामंजस्य करार केल्याचं समजतं. 

भारताच्या सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प मालदीव सरकार मुद्दाम रखडवतंय. पण दुसरीकडे, चीनचे अनेक मोठे प्रकल्प मालदीवमध्ये वेगाने सुरू आहेत. भारतीयांना 'वर्क परमिट' न देण्याचा निर्णयही अब्दुल्ला यामीन सरकारने गेल्या महिन्यात घेतला होता. त्याशिवाय, भारताने भेट म्हणून पाठवलेली हेलिकॉप्टर घेण्यासही त्यांनी नकार दिला होता. मालदीवमधून भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी ही खेळी सुरू असल्याचं मत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं मांडलं. स्टेलकोचे अनेक प्रकल्प चीनच्या सहकार्याने सुरू आहेत.  पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्याकडून मालदीवला फारशी मदतही मिळू शकत नाही. तरीही, पाकशी करार करून त्यांनी भारत सरकारला सूचक इशारा दिला आहे, याकडेही या अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं.  

मालदीवमधील राजकीय संकटाच्या वेळी, माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारताला लष्करी मदत पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला चीनने विरोध केला होता. मालदीवमध्ये कोणत्याही देशाचा लष्करी हस्तक्षेप नको, अशी भूमिका 'ड्रॅगन'ने घेतली होती. तेव्हापासूनच अब्दुल्ला यामीन यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं जाणकारांनी नमूद केलं.    

टॅग्स :MaldivesमालदीवNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनPakistanपाकिस्तान