शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:01 IST

मालदीवमधला राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा सर्वांनाच धक्कादायक होता.

नवी दिल्ली- मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून हिंद महासागरात भारताचा शेजारी असलेल्या मालदीवशी चीनमुळे भारताचे संबंध ताणले गेले होते. मालदीवमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि श्रीलंकेबरोबरच भारतानं मालदीवमधल्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातूनच भारतानं कूटनीतीक संदेशही दिला आहे. मालदीवला शुभेच्छा देत भारतानं एक प्रकारे चीन आणि अब्दुल्ला यामीनला कडक इशारा दिला आहे.विशेष म्हणजे मालदीवमधल्या जनतेलाही हे निवडणूक निकाल धक्का देणारे आहेत. कारण विरोधी पक्ष आणि सालेह समर्थकांनी निवडणुका प्रभावित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या वर्षी यामीन सरकारनं भारताबाबत टोकाचा विरोध दर्शवला होता. चीनबरोबर करारांवर करार करत सुटलेलं यामिन सरकार हे हिंद महासागरातही भारतासाठी डोकेदुखी ठरत होते.भारतातले मालदीवचे राजदूत अहमद मोहम्मद म्हणाले, ब-याच आपण एकमेकांवर आरोप करत असतो, हे इतिहासातून पाहायला मिळतं. परंतु आपला लोकशाहीवर विश्वास आहे. निवडणुकीचा निकाल मनासारखा लागला नसला तरी त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. राष्ट्रपती मोमून अब्दुल गय्यूम यांनी 30 वर्षांपर्यंत देशात शासन केलं. त्यांनीच लोकशाही पद्धतीनं निवडणूक होण्याची व्यवस्था केली. मोहम्मद यांना यामिनचे जवळचे समजले जाते. लवकरच ते मालदीवमध्ये परतून विरोधी पक्षाची भूमिका निभावतील.दरम्यान, माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताचे आभार प्रदर्शन केलं आहे. नशीद म्हणाले, श्रीलंका आणि मलेशियातील देशांची परिस्थिती पाहता चीनला आता समजलंच असले की असं का झालंय. मालदीवमधलं नवं सरकार यामीनच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्चं पुन्हा ऑडिट करेल. नशीद यांनी चीनवर जमीन हडपण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.

टॅग्स :Maldivesमालदीव