शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

छोटयाशा मालदीवने धुडकावले भारताचे 'युद्ध सरावा'चे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:50 IST

'मीलन' या सागरी युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे. येत्या 6 मार्चपासून मीलन हा एकत्रित सागरी युद्ध सराव सुरु होणार आहे.

ठळक मुद्देमालदीवमध्ये विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मीलन युद्ध सरावात एकूण 16 देश सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली -  'मीलन' या सागरी युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे. येत्या 6 मार्चपासून मीलन हा एकत्रित सागरी युद्ध सराव सुरु होणार आहे. नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी मालदीवने निमंत्रण नाकारल्याची माहिती दिली. हा नकार देताना मालदीवकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. लांबा यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे  लक्षण आहे. मालदीवमध्ये विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार देत न्यायाधीशांनाच बेडया ठोकल्या. ज्या दिवशी मालदीवमध्ये आणीबाणी संपणार होती. त्याचदिवशी आणीबाणीचा कालावधी आणखी 30 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. 

त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी नोंदवली. मालदीवचे विद्यमान सत्ताधारी चीनच्या निकट आहेत. या मीलन युद्ध सरावात एकूण 16 देश सहभागी होणार आहेत अशी माहिती नौदलातील सूत्रांनी दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर मीलन सागरी युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. मीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल. 

 

टॅग्स :Maldivesमालदीव