शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर उभारणीसाठीे समझोता घडवून आणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:31 IST

राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.

अयोध्या : राममंदिराच्या उभारणीसाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याला भाजपाने प्राधान्य दिले असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सांगितले.ते म्हणाले की, अयोध्येमध्ये राममंदिर उभारावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास भाजपा त्याची अंमलबजावणी करील किंवा या प्रश्नाशी संबंधित सर्व पक्षकारांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करू. जर सारे पर्याय संपले, तर संसदीय मार्गांचा अवलंब करून तोडगा काढला जाऊ शकतो. बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू उद््ध्वस्त केली हा वादविवादाचा विषय होऊच शकत नाही. कारसेवकांनी केलेली कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. रामजन्मभूमीसाठी विश्व हिंदू परिषदेने आजवर जो लढा दिला आहे तो देशातील जनतेला ज्ञात आहे.मौैर्य यांनी सांगितले की, रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी गोळीबारात ठार झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. रामभक्तांच्या मनात मुस्लिमांविषयी द्वेष नाही. आमचे विरोधक मुस्लिमांचे लांगुलचालन करून सलोख्याचे वातावरण बिघडवत असतात.>उद्धव ठाकरेंना टोलारामजन्मभूमीत रामलल्लांना एखाद्या तुरुंगात ठेवल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया तिथे दर्शन घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना मौर्य म्हणाले की, रामलल्ला हे अनादी व अनंत असून त्यांना कोणीही तुरुंगात डांबणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. राममंदिर बांधू इच्छिणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर