शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; गायक सोनू निगमचा वादग्रस्त सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:26 IST

नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मुंबई - नेहमीच सडेतोड वक्तव्य करून वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगमने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या शेल्टर होम बलात्कारकांड प्रकरणी प्रतिक्रिया देताना सोनू निगम याने देशात वेश्या व्यवसाय कायदेशीर ठरवण्याचा सल्ला दिला आहे. रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, "देशात होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांसाठी आपली लोकशाही जबाबदार आहे. मुलांना शाळेमध्ये लैंगिक शिक्षण दिले जात नाही. हे या सर्वांमागचे मुख्य कारण आहे. भारतात विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा सामना कसा करायचा, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे." "मुझफ्फरपूरला जे काही झाले ते या प्रकारांचा एक छोटासा भाग आहे. अशा प्रकारची कित्येक प्रकरणे समोरच येत नाहीत. सेक्स काय असतो हे शाळेत मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. तसेच त्यापासून पुढे काय होऊ शकते हेही सांगितले पाहिजे. तसेच दुसऱ्याच्या शरीराचा सन्मान कसा करावा, हे सुद्धा समजावून सांगण्याची गरज आहे, "असेही सोनूने पुढे सांगितले. यावेळी वेश्यावृत्ती वैध करण्याचा सल्ला देताना सोनूने नेदरलँडचे उदाहरण दिले. "एकंदरीत या देशात वेश्यावृत्ती वैध ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मी नेदरलँडची राजधानी अॅम्स्टरडॅम येथे होतो. तिथे वेश्या व्यवसाय वैध आहे. एका विशिष्ट्य श्रेणीतील महिलांना तिथे वेश्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मोठे पोलीस पथक वा फौजफाटा यांची तिथे गरज पडत नाही कारण सर्वच गोष्टी सामान्य आहेत," असेही त्याने सांगितले.  

टॅग्स :Sonu nigamसोनू निगमnewsबातम्याsexual harassmentलैंगिक छळ