शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

PM Modi: ...तर लॉकडाऊनची गरजच भासणार नाही; मोदींनी तरुणांवर सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:25 IST

make people aware about covid precautions pm narendra modi appeals to youths: देशातल्या तरुणांना आणि लहानग्यांना मोदीचं महत्त्वाचं आवाहन

नवी दिल्ली: लोकांचं आयुष्य वाचवणं आणि त्यांची उपजीविका सुरळीत राहणं याला प्राधान्य द्या. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू द्या, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारांना केल्या आहेत. आता आपल्याकडे कोरोनावरील लस उपलब्ध आहे. पण त्यासोबतच प्रतिबंधात्मक सूचनांचंदेखील पालन करा, असं आवाहन पंतप्रधांनी देशवासीयांना केलं. (make people aware about covid precautions pm narendra modi appeals to youths)लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू दे; पंतप्रधानांची राज्य सरकारांना स्पष्ट सूचनापंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना तरुण वर्गाला विशेष आवाहन केलं. या कठिण समयी अनेकांनी पुढाकार घेत सामाजिक कार्य केलं. गरजूंना जेवण, औषधं पुरवली. त्यांच्या राहण्याची सोय केली. त्या सगळ्या व्यक्तींचा, संस्थांचा मी आभारी आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी देशातल्या तरुणांना एक विशेष आवाहन केलं. तरुणांनी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवर समित्या स्थापन कराव्या. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक नियम याबद्दल जनजागृती करावी. लोकांना लसीकरणाची माहिती द्यावी. तरुणांनी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास आपल्याला कंटेन्मेंट झोनची, लॉकडाऊनची गरजच भासणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.कामगारांनी स्थलांतर करू नये, शेतकरी अन् कामगारांचं होईल लसीकरणस्वच्छता अभियानातील लहानग्यांच्या योगदानाचा संदर्भ देत मोदींनी चिमुकल्यांनादेखील महत्त्वाचं आव्हान केलं. आजही अनेकजण गरज नसताना बाहेर पडतात. घरातल्या अशा व्यक्तींना बाहेर जाण्यापासून रोखण्याचं काम चिमुकल्यांनी करावं. हा बालहट्ट देशाच्या कामी येईल. स्वच्छ भारत अभियानात लहानग्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी लहानग्यांनी मोठ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आता पुन्हा एकदा लहानग्यांवर मी आवाहन करतो. त्यांनी विनाकारण, काम नसताना उगाच घराबाहेर पडणाऱ्या कुटुंबीयांनी बाहेर जाऊ देऊ नये. त्यांनी यासाठी हट्ट करावा. त्यांचा हा हट्ट देशासाठी महत्त्वाचा ठरेल, असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस