शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

'शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करा आणि वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:09 IST

‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे. सुषमा कुमारीचे वडील ब्रिज किशोर यादव मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले.

पाटणा- श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या कॅम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.के. यादव शहीद झाले होते, तर बीएसएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या कृत्याचा सगळीकडून निषेध केला जातो आहे. शहीद जवान बी.के.यादव यांच्या मुलीनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे. सुषमा कुमारीचे वडील ब्रिज किशोर यादव मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. ‘माझ्या वडिलांचे बलिदान सार्थ ठरवण्यासाठी १०० दहशतवाद्यांची मुंडकी कापून आणा,’ असं सुषमा कुमारी यांनी म्हटलं आहे.

‘पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, असं आम्हाला वाटतं,’ अशी अपेक्षा सुषमा कुमरी यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्या कुटुंबाला आणि बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कमलचक गावातील सर्वांना वडिलांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो,’ असंही तिने म्हंटलं आहे. ब्रिज किशोर यादव यांच्यावर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या १८२ व्या बटालियनवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना लष्करात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ब्रिज किशोर यादव यांना वीरमरण आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबीयांना ११ लाखांची मदत जाहीर केली. तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

यादव यांची मुलगी सुषमा कुमारी (वय 18) हिने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबतच्या बोलण्याला काहीही अर्थ नसल्याचं सुषमा कुमारी हिने म्हंटलं आहे.  पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊलं उचलल्याचं आम्हाला पाहायचं आहे, असं सुषमा कुमारी यांनी म्हंटलं आहे.

नितीश कुमार यांनी व्यक्त केलं दुःखनितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘ब्रिज किशोर यादव यांचे बलिदान देशाच्या कायम लक्षात राहिल,’ असं मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मंगळवारी श्रीनगरमधील बीएसएफच्या बटालियनवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पहाटे ४.३० वाजता हा हल्ला करण्यात आला. यानंतर दुपारपर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात ब्रिज किशोर यादव शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.