शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'स्वतःमध्ये वेळीच बदल करा, अन्यथा...';नरेंद्र मोदींचा भाजप खासदारांना इशारा, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 14:42 IST

आज भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींनी आपल्याच पक्षाच्या खासदारांना कडक शब्दात इशारा दिला.

नवी दिल्ली: सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) उपस्थित होते. यावेळी मोदींनी अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या भाजप खासदारांना कडक शब्दात इशारा देत हिवाळी अधिवेशनात आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. 

स्वतःमध्ये बदल करा, अन्यथा...यावेळी गैरहजर खासदारांना उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी तुम्हाला नेमहीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. तुमच्या अनुपस्थितीमुळे कामांवर परिणाम पडतो. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहावे. लहान मुलाप्रमाणे सतत सांगणे मला आवडत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला नाही, तर भविष्यात मला तुमच्या संदर्भात मोठा बदल करावा लागेल', अशा कडक शब्दात मोदींनी गैरहजर खासदारांना इशारा दिला आहे. 

14 डिसेंबरला 'चाय पे चर्चा'

बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात जाऊन जिल्हाध्यक्ष आणि इतर स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक पातळीला पक्ष मजबूत करण्यासाठी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमाये आयोजन करण्यास सांगितले आहे. याच अनुषंगाने येत्या 14 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये सर्व भाजप नेत्यांना चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी बोलवणार आहेत.

पद्म पुरस्कार विजेत्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना खासदार क्रीडा स्पर्धा, खासदार फिटनेस चाइल्ड स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले आहे. तसेच आपापल्या भागात राहणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्याशी सतत संवाद साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या या इशाऱ्याचा आणि सल्ल्याचा गैरहजर खासदारांवर काय परिणाम होतो, हे येत्या काळात दिसेलच.

यापूर्वीही व्यक्त केली नाराजीविशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना अशावेळी इशारा दिला, जेव्हा अधिवेशनात विरोधक एकजूट होवून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. नागालँड गोळीबार, खासदारांचे निलंबन यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे. यापूर्वीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाParliamentसंसद