छत्तीसगडमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. एक प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात ६ पवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एक मालगाडी आणि प्रवासी ट्रेनची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखम झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
ही टक्कर भीषण झाली. यामध्ये अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही डबे मालगाडीवर कोसळले. अनेक मालगाडीच्या डब्यांचेही रुळावरून घसरण झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. रेल्वेने मदत मोहिम सुरू केली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
अपघात कसा झाला?
बिलासपूर-कटनी विभागात लाल खंड परिसराजवळ कोरबा पॅसेंजर ट्रेन एका थांबलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे काही डबे एकमेकांवर आदळले, अनेक डबे रुळावरून घसरले आणि ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टीमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामुळे मार्गावरील रेल्वे ऑपरेशन विस्कळीत झाले. रेल्वे बचाव पथके, आरपीएफ कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पोहोचले. आपत्कालीन वैद्यकीय पथके देखील जखमींवर उपचार करत आहेत.
Web Summary : A major train accident in Chhattisgarh resulted in six fatalities after a passenger train collided with a goods train. Several others were seriously injured. Rescue teams have arrived at the scene to conduct rescue operations. Many compartments damaged.
Web Summary : छत्तीसगढ़ में एक बड़ा रेल हादसा हुआ, जिसमें एक यात्री ट्रेन मालगाड़ी से टकरा गई। इस हादसे में छह लोगों की मौत हो गई और कई गंभीर रूप से घायल हो गए। बचाव दल मौके पर पहुंचकर बचाव कार्य कर रहे हैं। कई डिब्बे क्षतिग्रस्त।