शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये मोठा ग्रेनेड हल्ला, दोन महिलांसह सहाजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:22 IST

दहशतवाद्यांना लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करायचे होते, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी टॅक्सी स्टँडवर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की, शेजारी उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. 

या घटनेनंतर सुरक्षा दलांने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करायचे होते, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरूजम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या सुंबल पुल परिसरात ग्रेनड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा जणांपैकी चार जणांचा बांदीपोरामध्ये उपचार सुरू आहे, तर दोन महिलांना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. घटनेनंर संपूर्ण परिसर रिकामा करण्या आला असून, मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं आहे.

सुरक्षा दलाची कारवाई सुरुचजम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी संघटना सुरक्षा दलाकडून राबवल्‍या जात असलेल्‍या कारवायांमुळे संतापल्या आहेत. दहशतवाद्यांनी यापूर्वी गैर-काश्मीरींना लक्ष्य केले होते. यामध्ये यूपी-बिहारमधून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. त्याआधी पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात लष्कराचे सहा जवान शहीद झाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान