शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी मोठी घडामोड; छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 7 नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:11 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा 15 डिसेंबरला छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Naxalite Encounter : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील दक्षिण अबुझमद भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले. या सर्वांचे मृतदेह सापडले असून, त्यात एका उच्चपदस्थ नक्षलवाद्याचाही समावेश आहे, जो रेड मिलिटंट्सच्या केंद्रीय समितीचा भाग होता. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीन वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे.

नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्याचे विशेष टास्क फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव रक्षक यांचे संयुक्त पथक दक्षिण अबुझमद भागात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवत होते. सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

अधूनमधून गोळीबारमिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत केंद्रीय समिती स्तरावरील नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलविरोधी शोध मोहिमेत मंगळवारी विशेष टास्क फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलिसासह नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक दक्षिण अबुझमद भागाकडे रवाना झाले होते.

7 नक्षलवादी ठारएसपी प्रभात कुमार म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 15 डिसेंबरला बस्तरला भेट देणार आहेत. शाह यांच्या बस्तर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांनी अबुझमद भागात 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांचे मृतदेहही सापडले आहेत. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी याला दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीAmit Shahअमित शाह