शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:50 IST

Madvi Hidma Death News: आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर जबर कारवाई करत नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं आहे. या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे अनेक मोठे नेते आणि कमांडर मारले गेल्याने नक्षल चळवळ  आता अखेरच्या घटका मोजत आहे. दरम्यान, आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार केला असून, आज सकाळी झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नीही या चकमकीत मारली गेली आहे. हिडमा याच्यावर कोट्यवधी रुपयांचं बक्षीस होतं.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या नक्षल प्रभावीत भागातील शेजारील  राज्यांना लागून असलेल्या सीमेवर मंगळवारी सकाळपासूनच डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये हिडमा आणि त्याच्या पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी मारले गेले आहेत.

माडवी हिडमा हा बस्तरमधील नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठा कमांडर होता. तसेच तो सेंट्रल टीमला सांभाळत होता. त्याच्यावर छत्तीसगडसह इतर राज्यांकडून १ कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. काही काळापूर्वी सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टाच्या पर्वतरांगांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती तेव्हा माडवी हिडमा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता तो सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे.

दरम्यान, टॉप नक्षली कमांडर बसवा राजू हा मारला गेल्यानंतर माडवी हिडमा याच्या हातात नक्षलवादाचं नेतृत्व आलं होतं. बसवा राजू याच्या मृत्यूनंतर माडवी हिडमा याला माओवादी संघटनेचा नवा सरचिटणीस बनवण्यात आलं होतं. मात्र सुरक्षा दलांनी आज त्याला कंठस्नान घातले. हिडमा याचा मृत्यू माओवाद्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.    

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड