शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

देशातून झाली मक्याची सहा वर्षांतील उच्चांकी निर्यात; बांगलादेशचा हिस्सा ६६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 00:40 IST

बांगलादेशचा हिस्सा ६६ टक्के; अपेडाने जाहीर केली आकडेवारी

नवी दिल्ली : बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आल्यामुळे देशातील मक्याची निर्यात सहा वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एकट्या बांगलादेशने ६६ टक्के मक्याची खरेदी केल्यामुळे मक्याच्या निर्यातीला चालना मिळाली आहे.

अपेडा या निर्यातविषयक संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ९.२२ लाख टन मका निर्यात केला गेला. त्याचे मूल्य १८४.५२ दशलक्ष डॉलर राहिले. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये ३.७०लाख टन मका (मूल्य १४२.७८ दशलक्ष डॉलर)  निर्यात केला गेला होता. एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबरअखेर १५.०४ लाख टन मक्याची निर्यात झाली असून, त्याचे मूल्य ३२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे अपेडाने जाहीर केले आहे. 

बांगलादेशमुळे उच्चांक

चालू आर्थिक वर्षामध्ये बांगलादेशने भारतामधून ६.१८ लाख टन मक्याची आयात केली आहे. याआधी सन २०११२-१३मध्ये झालेली ४७.८८ लाख  टनांची निर्यात ही बांगलादेशला झालेली सर्वाधिक निर्यात होती. यंदा २०० ते २४० डॉलर प्रतिटन (म्हण जेच १४,७०० ते १७,६५० रुपये) या दराने मक्याची निर्यात केली गेली. चालू वर्षासाठी जाहीर केलेल्या आधार किमतीपेक्षा हा दर कमीच आहे. जुलै २० ते जून २१ या काळासाठी १८,५०० रुपये प्रतिटन हा आधारभाव जाहीर झाला आहे.

टॅग्स :Indiaभारत