शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

खासदार मोइत्रांचा संसद आयडी ४ ठिकाणांहून ऑपरेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:55 IST

निवडणूक निकालावर हकालपट्टी अवलंबून

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा संसदेचा अधिकृत लॉगिन आयडी केवळ दुबईतील व्यावसायिक मित्र दर्शन हिरानंदानी यांनाच शेअर केला नसून, त्याचबरोबर इतर ठिकाणीही शेअर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे अकाउंट दुबईबरोबरच अमेरिका, बंगळुरू येथूनही ऑपरेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी त्यांनी कबूल केले होते की, लोकसभेत विचारले जाणारे प्रश्न टाइप करण्यासाठी हिरानंदानी यांच्या कार्यालयातील कोणीतरी त्यांना मदत करण्यासाठी हे अकाउंट दुबईतून ऑपरेट केले. संसद सदस्यांनी सहायक व कर्मचाऱ्यांना लॉगिन शेअर करू नयेत, असा कोणताही नियम नाही, असा दावाही त्यांनी केला होता. त्यांनी फक्त प्रश्न टाइप करण्यासाठी व्यावसायिक मित्राची मदत घेतली आणि ओटीपी त्यांच्या नियंत्रणात होता, असेही त्यांनी म्हटले होते.माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समितीला सांगितले की, मोइत्रांचे लॉगिन अमेरिका, बंगळुरू, कोलकाता व दुबईहूनही वापरण्यात आले.

लॉगिनबाबत नवे नियम nलॉगिन आयडी शेअर केल्याबद्दलच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी संसदेच्या नैतिकता समितीने अहवाल लोकसभा अध्यक्षांना पाठवला आहे. nमोइत्रांच्या दाव्यांची दखल घेत लोकसभा सचिवालयाने नवे नियम जारी करून म्हटले आहे की, खासदारांना त्यांचे लॉगिन आयडी त्यांच्या सदस्यांसमवेतही शेअर करता येणार नाहीत.nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महुआ मोइत्रा यांच्या हकालपट्टीबाबतचा निर्णय पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असेल. nममता बॅनर्जी यांनी काल म्हटले होते की, या मुद्द्यावर महुआ मोइत्रांची हकालपट्टी केल्यास केंद्र सरकारवर हे बूमरँग होईल. 

 

टॅग्स :Member of parliamentखासदारMahua Moitraमहुआ मोईत्रा