शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"मी सीबीआय चौकशीसाठी तयार...", 'कॅश फॉर क्वेरी'च्या आरोपावर महुआ मोईत्रांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 16:27 IST

उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले. यावर आता महुआ मोईत्रा यांनी भाष्य केले आहे.

नवी दिल्ली : 'कॅश फॉर क्वेरी' च्या आरोपाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले. यावर आता महुआ मोईत्रा यांनी भाष्य केले आहे.

याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभा पॅनेलसमोर प्रतिज्ञापत्र केल्यानंतर आणि सरकारी साक्षीदार बनल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "सीबीआय, एथिक्स कमिटीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे."

एका स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, महुआ मोईत्रा यांनी नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी गौतम अदानींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या निष्कलंक प्रतिष्ठेमुळे विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी सोशल बेवसाईट एक्सवर पोस्ट केले आहे. "सीबीआय आणि एथिक्स कमिटीने (ज्यामध्ये भाजपचे पूर्ण बहुमत आहे) जर त्यांनी मला बोलविले तर मी प्रश्नांची उत्तरे देण्याचे स्वागत करते", असे महुआ मोईत्रा यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.  तसेच, "एथिक्स कमिटीचे अध्यक्ष मीडियाशी खुलेपणाने बोलतात. 'प्रतिज्ञापत्र' माध्यमांपर्यंत कसे पोहोचते? अध्यक्षांनी आधी हे कसे फुटले याची चौकशी करावी. मी पुन्हा सांगते, अदानींबद्दल माझे तोंड बंद करण्यासाठी मला लोकसभेतून बाहेर काढणे, हा भाजपचा एक सूत्री अजेंडा आहे," असे महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे.

'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गेल्या रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यानंतर निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Member of parliamentखासदारTrinamool Congressतृणमूल काँग्रेसParliamentसंसद