शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गांधी, पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी केले प्रामाणिक प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:38 IST

गुजरातमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन

राजकोट : ‘आमच्या सरकारने गत आठ वर्षांत महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या काळात सरकारने नेहमीच गरिबांच्या आत्मसन्मानाचे संरक्षण केले,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणून २६ मे रोजी ८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी यांनी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अटकोट येथे शनिवारी २०० बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले की, या आठ वर्षांत आपण असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे लोकांची मान खाली जाईल.

महात्मा गांधी यांना असा भारत हवा होता ज्यात गरीब, दलित, आदिवासी आणि महिला सशक्त असतील. जिथे स्वच्छता आणि आरोग्य हे जीवनाचा अविभाज्य भाग असेल. अर्थव्यवस्थेला स्वदेशीचा आधार असेल. कोरोनाच्या काळात सरकारने गरिबांसाठी अन्नाचे भांडार खुले केले.  ते म्हणाले की, ‘डबल इंजिन सरकारने गुजरातचा वेगाने विकास केला आहे.’ (वृत्तसंस्था)

आठ वर्षांत तीन कोटी घरेमोदी म्हणाले की, गत आठ वर्षांत तीन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना पक्की घरे दिली आहेत. १० कोटी कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून दिले, तर नऊ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देऊन चुलीच्या धुरापासून वाचविले आहे. २.५ कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन दिले आहेत. सहा कोटी कुटुंबांना नळाच्या पाण्याचे कनेक्शन दिले. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचारांसाठी संरक्षण दिले आहे. 

युद्धामुळे वाढले खतांचे दरगांधीनगर : कोरोनाची साथ आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली. मात्र, देशातील शेतकऱ्यांना युरिया आणि अन्य खतांची टंचाई भासायला नको याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. युरिया आयातीवर सरकार प्रति पोते ३२०० रुपयांचा भार सहन करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सहकारावरील एका परिसंवादात बोलताना ते बाेलत हाेते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपा