शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

महात्मा गांधीजी यांच्या ग्रामस्वराज्यासाठी लोकस्वराज्य पदयात्रा; बेळगावहून प्रस्थान; ३० जानेवारीला हुबळीत सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:24 IST

राम मगदूम गडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका ...

राम मगदूमगडहिंग्लज : देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी हिंदूराष्ट्र निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीऐवजी एकपक्षीय (भाजप) सरकारमुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेऐवजी सगळी अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हातात दिली जात आहे. त्यामुळे देशासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, गांधीजींच्या विचारानेच त्यावर मात करता येईल, अशी आमची भूमिका आहे. किंबहुना, गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य निर्मितीसाठीच लोकस्वराज्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘लोकमत’ला दिली.महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गोगादे येथील विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानतर्फे काँग्रेसच्या सहकार्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. बेळगाव येथील ऐतिहासिक वीर सौध-पंपसरोवरपासून पदयात्रेला सुरुवात झाली असून, ३० जानेवारीला हुबळीत पदयात्रेची सांगता होणार आहे.दिवाण म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण सर्वांना मुक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘चवदार’ तळ्याच्या सत्याग्रहातून पाणी खुले केले. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहातून लोकांना नैसर्गिक संपत्तीवरील अधिकार दिला. विनोबाजींनी भूदान चळवळीतून भूमिहीनांना जमीन मिळवून दिली.महागड्या शिक्षणामुळे आज बहुजनांना पुन्हा ज्ञानापासून वंचित ठेवले जात आहे. पाण्याला विक्रीची वस्तू बनविल्यामुळे जनता पाण्याला महाग झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवरील भूमिपुत्रांचा अधिकार काढून घेऊन अधिवासी, भटके-विमुक्तांना विस्थापित केले जात आहे.विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार आणि भांडवलदार जमिनी हिसकावून घेत आहेत. किंबहुना, चेहरा बदलून वर्णव्यवस्थाच येत असून, पुन्हा ‘मनुस्मृती’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंडित नेहरू यांनी बहुपक्षीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, संमिश्र अर्थव्यवस्था व अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण या मजबूत पायावर देशाची उभारणी केली. त्यांच्या विचारांनाच सुरुंग लावला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.५०० किलोमीटर, ३४ दिवस..!१९५८ मध्ये विनोबाजींनी बेळगावपासून भूदान पदयात्रा काढून हुबळीत मुक्काम केला होता. त्याच मार्गाने सुमारे ५०० किलोमीटरची ३४ दिवसांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. देशभरातील काँग्रेस व सर्वोदयी कार्यकर्ते आणि गांधीप्रेमी नागरिक पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे समन्वयक किरणभाई मुगबसव (हुबळी) यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीbelgaonबेळगाव