शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : पाकच्या पाहुणचाराचं कौतुक करणाऱ्या पवारांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:34 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिक येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नाशिक - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिक येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. दरम्यान, पाकिस्तानी पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याचाही मोदींनी समाचार घेतला. काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो. पण शरद पवार यांनी व्होटबँकेच्या राजकारणासाठी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे दु:ख झाल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानचा आवर्जुन उल्लेख केला. आपल्याच देशातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शत्रूचा फायदा होत असल्याचा टोला मोदींनी लगावला. यावेळी पाकिस्तानी पाहुणचार भावला, असे सांगणाऱ्या शरद पवार यांच्यावरही मोदींनी घणाघाती टीका केली.  ते म्हणाले, ''काँग्रेसी नेत्यांचे कन्फ्युजन मी समजू शकतो, पण शरद पवार? केवळ व्होटबँकेच्या राजकारणासाठी शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते जेव्हा अशी चुकीची वक्तव्ये करतात तेव्हा दु:ख होते. त्यांना शेजारील देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी. तेथील शासक, प्रशासक चांगले वाटतात, हे सुद्धा त्यांचेच निरीक्षण आहे. पण दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे, अत्याचार आणि शोषणाची छायाचित्रे कुठून येतात हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जाणतो.'' असा टोला मोदींनी शरद पवार यांना लगावला. 

 काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानात माझे चांगले स्वागत झाले. भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात असे शरद पवार यांनी म्हटले होते. पाकिस्तानमध्ये लोकांवर अन्याय होतो, असे भारतातील काही लोक म्हणतात हे खोटे आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात असे सांगत पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली  होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तानNashikनाशिक