शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२.६८ लाख कंपन्यांच्या नोंदणीसह महाराष्ट्र अव्वल; दिल्ली १.६० लाख कंपन्यांसह दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 08:09 IST

सरकारी आकडेवारीनुसार गुजरातमध्ये ७९,४७१, तर हरयाणामध्ये ७३,७१४ कंपन्या नोंदणीकृत आहेत. तुलनेने पंजाब खूप मागे असून तेथे केवळ २१,२९६ कंपन्या आहेत.

हरीश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात एकूण २.६८ लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत. देशभरात नोंद झालेल्या सुमारे १५ लाख कंपन्यांपैकी सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. दिल्ली १.६० लाख कंपन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर उत्तर प्रदेश १.५७ लाख कंपन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सरकारी आकडेवारीनुसार गुजरातमध्ये ७९,४७१, तर हरयाणामध्ये ७३,७१४ कंपन्या नोंदणीकृत आहेत. तुलनेने पंजाब खूप मागे असून तेथे केवळ २१,२९६ कंपन्या आहेत.

मागील आठवड्यात लोकसभेत अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. सरकारने स्पष्ट केले की, २०१६ मध्ये कंपन्यांच्या नोंदणीसाठी केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले, तसेच २०२४ मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यान्वित करण्यात आले. 

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून ७६० कंपन्या स्थलांतरित

कॉर्पोरेट व्यवहारमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना महुआ मोइत्रा यांना सांगितले की, १ जून २०१४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गुजरातमधून ८४६ कंपन्यांनी आपली कार्यालये अन्य राज्यांत हलविली.

याच कालावधीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून सुमारे ७६० कंपन्या गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्या. याशिवाय, ५१३७ कंपन्यांनी या चार राज्यांतून इतर राज्यांमध्ये आपली नोंदणीकृत कार्यालये हलवली आहेत.

पारदर्शकता वाढली, अनुपालन खर्च घटला

कंपन्यांचे नाव काढून टाकण्यासाठीच्या अर्जांवरही डिजिटल पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. या उपाययोजनांमुळे प्रक्रियात्मक विलंब कमी झाले, पारदर्शकता वाढली व अनुपालन खर्च घटला असून त्यामुळे उद्योजकता व गुंतवणुकीला चालना मिळाली आहे.

१ जून २०१४ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथून एकूण ५,१३७ कंपन्यांनी आपली नोंदणीकृत कार्यालये अन्य राज्यांत स्थलांतरित केली आहेत. मंत्र्यांनी स्पष्ट केले की कंपनी कायदा, २०१३ मध्ये मुख्यालय ही संज्ञा परिभाषित केलेली नाही. तथापि, १५२ सूचीबद्ध कंपन्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथून त्यांची नोंदणीकृत कार्यालये इतर राज्यांमध्ये स्थलांतरित केली आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra leads in company registrations, followed by Delhi and UP.

Web Summary : Maharashtra tops India with 2.68 lakh registered companies. Delhi and Uttar Pradesh follow. Government initiatives like online portals and Central Processing Centers boost transparency and reduce compliance costs, encouraging entrepreneurship and investment across states.