शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:11 IST

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. यात महाराष्ट्र ११,०६,०८७ लाभर्थ्यांसह अग्रस्थानी आहे.२०१६-१७ मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विविध क्षेत्रांतील कंपन्या आणि सेवायोजकांना नवीन नोकरभरती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार देणा-या सर्व कंपन्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह योजना (ईपीएस) आणि कर्मचारी भविष्य निधीतील (ईपीएफ) योगदान ( १२ टक्के किंवा अनुज्ञेय) सरकारी तिजोरीतून देण्याची ही योजना आहे. सर्व पात्र कंपन्या/सेवायोजक/नियोक्त्यांसाठी तीन वर्षे ही योजना लागू आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेतहत २६ जुलै २०१८ पर्यंत ६१ लाख १२ हजार ५२७ जणांना लाभ मिळाला आहे. मेक इन इंडिया आणि सरकारच्या अन्य योजनांसाठी पूरक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. विशेष सेवा, वस्त्रोद्योग, तयार कपडे, स्वच्छता, साफ-सफाई, इस्पितळ आणि हिºयांना पैलू पाडणे आदी क्षेत्रातील आस्थापनांचा या योजनेत समावेश आहे. जवळपास २५ क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत महाराष्टÑ देशात अग्रणी असून, गोवा शेवटच्या स्थानी आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत काँग्रेसचे कपिल सिबल यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली.प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे राज्यनिहाय लाभार्थीराज्य - लाभार्थीमहाराष्ट्र ११०६०८७तामिळनाडू ७१००८८कर्नाटक ५६९४३३गुजरात ५६०८५३हरियाणा ५१२३१७आंध्र प्रदेश ४८८८६९उत्तर प्रदेश ४४१९४५दिल्ली ३७११२२राजस्थान २३३३३१मध्यप्रदेश १८१८२५पश्चिम बंगाल १७८३९२उत्तराखंड १५९०९७केरळ १०८८१३पंजाब १०६७६६चंदीगड ८३०७३हिमाचल प्रदेश ७२७४०बिहार ७२९७०ओडिशा ६६९४७छत्तीसगढ ५९१६४झारखंड १९५७८आसाम ५०८३गोवा ४९३४एकूण ६११२५२७(तेलंगणासह)

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र