शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जलदगती न्यायालयांच्या स्थापनेत महाराष्ट्र दुसरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:43 IST

गंभीर गुन्ह्यांसह महिला, वयोवृद्ध आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांचे काम वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राने सर्वात जास्त जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करून दुसरे स्थान मिळवले आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्यांसह महिला, वयोवृद्ध आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांचे काम वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राने सर्वात जास्त जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करून दुसरे स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत त्यात काही वाढ केलेली नसली तरीही त्याचे हे स्थान कायम आहे. महाराष्ट्रात १०० अशी न्यायालये स्थापन झाली असून राजस्थान पहिल्या तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे.विधी मंत्रालयातील अधिकाºयाने सांगितले की, जलदगती न्यायालय स्थापन्याचे काम पूर्णपणे राज्याचे आहे. देशात २०१५ मध्ये अशी २८१ न्यायालये होती. ती २०१६ मध्ये ५२४ तर २०१७ मध्ये ७२७ झाली.जलदगती न्यायालयांच्या स्थापनेसाठी आर्थिक प्रोत्साहनातवाढ केली गेली आहे. करात सवलतीच्या रुपात मिळणारा निधी ३२ वरून ४२ टक्के केला गेला आहे. राज्यांनी या न्यायालयांच्या संख्येत वाढ करावी, असे आवाहन केंद्राने केले आहे.२०१५-२०१७ दरम्यान राजस्थान, ओडिशा, मिझोराम, मेघालय, कर्नाटक, केरळ व मध्य प्रदेशमध्ये एकाही अशा न्यायालयाच्या स्थापनेची माहिती केंद्राकडे आलेली नाही. पंजाबने २०१५ मध्ये असे एक न्यायालय स्थापन केले.>कोणत्या राज्यात किती?उत्तर प्रदेशने २०१६ मध्ये १८३ आणि २०१७ मध्ये २७३ न्यायालये स्थापन केली. महाराष्ट्राने २०१५ मध्ये ८०, २०१६ आणि २०१७ मध्ये अशी १०० न्यायालये स्थापन केली. तिसºया क्रमांकावरील पश्चिम बंगालने २०१५ मध्ये ८८, २०१६ व २०१७ मध्ये अनुक्रमे ७७ व ८८ न्यायालये स्थापन केली. गोव्याने २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये ५ व २०१७ मध्ये ४ न्यायालये स्थापन केली. दिल्लीत २०१५ मध्ये १५, पुढील वर्षी १३ आणि त्यानंतरच्या वर्षी १४ न्यायालये स्थापन केली.

टॅग्स :Courtन्यायालय