शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निवास महाराष्ट्र सदनात, उपचार हरियाणा भवनात; हरिभाऊ राठोड यांना आला अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:23 IST

नवीन महाराष्ट्र सदनात वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने येथे थांबलेल्या आमदाराला २४ तास आरोग्य सेवा देणा-या हरियाणा भवनात उपचार घ्यावे लागले.

- विकास झाडे

नवी दिल्ली : नवीन महाराष्ट्र सदनात वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध नसल्याने येथे थांबलेल्या आमदाराला २४ तास आरोग्य सेवा देणा-या हरियाणा भवनात उपचार घ्यावे लागले.विधान परिषदेचे सदस्य हरिभाऊ राठोड एका शासकीय बैठकीसाठी सोमवारी रात्री दिल्लीत आलेत. त्यांचा मुक्काम नवीन महाराष्टÑ सदनात होता. मंगळवारी सकाळी त्यांचा अचानक रक्तदाब वाढला. त्यांनी स्वागतकक्षात फोन करून माहिती दिली व तातडीने डॉक्टर उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली. तेव्हा आपल्याकडे डॉक्टर नसतो आणि तशी यंत्रणाही नाही, अशी माहिती देण्यात आली. तुम्ही डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात जा ते २४ तास उघडे असते असा सल्ला देण्यात आला. आमदार राठोड यांनी त्यांच्याकडील औषधी घेऊन दोन तास काढले. नंतर दिल्लीतील एका सहकाºयास बोलावून कोपर्निकस मार्गावरील हरियाणा भवनात डॉ. अग्रवाल यांच्याकडून तपासणी करून घेतली.मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारप्रदेश भाजपाच्या वैद्यकीय सेलचे संयोजक डॉ. अजित गोपचाडे यांनी सदनात उपचार होत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी नितीन गडकरी यांना हा किस्सा सांगितला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्टÑ सदनात वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.जबाबदार कोण?महाराष्ट्र सदनातील राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. वैद्यकीय सेवेसाठी महाराष्ट्र सदनाकडून राज्य सरकारला काही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे काय? असे मेसेजवर विचारले, त्याचेही उत्तर मिळाले नाही. सहायक निवासी आयुक्त (प्रशासन) सुमन रावत चंद्र यांनीही वरिष्ठ अधिकाºयांकडे बोट दाखविले.

महाराष्ट्र सदनात एखादा माणूस उपचाराविना केव्हा मरेल काही नेम नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.- आमदार हरिभाऊ राठोड

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र