शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्र तिसरा; उत्तर प्रदेश अव्वल, तर गुजरात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:52 IST

राज्यात ६ लाखांचा टप्पा पूर्ण, यूपी पहिल्या स्थानी

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत जवळपास ७५ लाख कोरोना योद्धांना लस देण्यात आली असली तरी या मोहिमेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून ६ लाखांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.लसीकरणात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून,गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. देशातील लसीकरण मोहिमेत १० राज्यांचा ६९% वाटा आहे. देशात आतापर्यंत ७४ लाख ३० हजार ८६६ कोरोना योद्धांना लस देण्यात आली आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सवार्धिक लसीकरण झाले आहे. मात्र या वेगाने देशातील १३० कोटींपैकी ७५ टक्के जनतेला लस देण्यासाठी बराच काळ जाईल, हे स्पष्ट आहे.आधी आरोग्य कर्मचाऱी, नंतर कोरोना योद्धे यांना यांचे लसीकरण सुरू असून, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व काही ना काही व्याधी असलेल्यांना लस देण्यात येणार आहे या तिन्हींची संख्या सुमारे ३० कोटी आहे. तिसऱ्या टप्प्यातील तसेच नंतरच्या सर्वांना मोफत लस दिली जाणार की त्यासाठी पैसे द्यावे लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.३३८ कोटींच्या लसींची निर्यातभारताने ८ फेब्रुवारीपर्यंत ३३८ कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचे ६२.७ लाख डोस भारताने निर्यात केले. खासगी रुग्णालयांना परवानगी हवीलसीकरण वेगाने व्हावे आणि संक्रमण टाळण्यासाठी खासगी रुग्णालये, दवाखाने व लॅब यांची मदत घ्यावी तसेच त्यांना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाढत आहे.लाॅकडाऊनचा विचार नाही - राजेश टाेपेराज्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तुर्तास लाॅकडाऊन लागू करण्याबाबत विचार नाही, असे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी सांगितले.६०२ जिल्ह्यांत आठवडाभरात एकही बळी नाहीदेशामध्ये लसीकरणाला वेग आलेला असताना विविध राज्यांत ६०२ जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनाचा एकही बळी गेलेला नाही.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कोरोनाचे ९३०९ नवे रुग्ण सापडले, तर ७८ जण मरण पावले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस