शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 04:44 IST

देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात २०१६साली शेतकरी व शेतमजूर मिळून ११,३७० जणांनी आत्महत्या केली. त्यातील ३६६१ महाराष्ट्रातील होते. ही धक्कादायक आकडेवारी सरकारने संसदेत दिली. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने (एनसीआरबी) २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित हंगामी माहिती दिली. तीत म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य आहे. तेथे २०७९ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली. तिसºया क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत.वेगवेगळ््या राज्यांतील शेतकºयांच्या आत्महत्या जास्तही असू शकतात. कारण ही तात्पुरती आकडेवारी आहे. सविस्तर अहवाल बनवण्यासाठी आणखी बारकाईने अभ्यास केल्यास आकड्यात बदल होऊ शकतो. शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यात तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह इतर खासदारांचा समावेश होता.एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकºयांनी आत्महत्या केली.गोव्यात फक्त एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशात आठ राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत याच कालावधीत एकही अशी आत्महत्या झाल्याचे समोर आलेले नाही. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत बिहार, लक्षद्वीप, दमण-दीव, दादरा- नगर हवेली, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँडचा समावेश आहे.केंद्रीय कृषी मंत्रालय आणि नीती आयोग एकत्र येऊन शेती लाभदायक व्हावी यासाठी काम करत आहे. सरकारने नुकताच शेतमालाला हमीभाव दुपट्ट केला. या परिस्थितीत येत्या काळात काही चांगले बदल घडतील अशी आशा आहे.>शेतमजुरांचेही प्रमाण मोठेएनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये देशात एकूण १२,३६० आणि २०१५ मध्ये १२,६०२ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर २०१४ मध्ये एकूण ४,००४ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. त्यात १,४३६ शेतमजूर तर २,५६८ शेतकरी होते. २०१५ मध्ये एकूण ४,२९१ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. यात शेतकरी ३,०३० तर १,२६१ शेतमजूर होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या