शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य, सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये; सरन्यायाधीशांचं महत्वाचं विधान!

By मोरेश्वर येरम | Updated: March 15, 2023 13:07 IST

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या भूमिकेबाबत युक्तिवाद सुरू आहे.

नवी दिल्ली-

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या भूमिकेबाबत युक्तिवाद सुरू आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता राज्यपालांनी घेतलेले निर्णय कसे योग्य आणि नियमाला धरुन होते हे कोर्टाला पटवून देत होते. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत महत्वपूर्ण विधान केलं. राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहून काम करणं गरजेचं आहे. सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये. यापासून राज्यपालांनी दूर राहिलं पाहिजे, अशी अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. 

आपल्या नेत्याची भूमिका पटत नव्हती तर आमदारांकडे उपाय होता. आपल्या नेता पक्षाची नीती बाळगत नाही असं सांगून ते मतदान घेऊ शकले असते. पण यात राज्यपाल तुम्ही आता बहुमत सिद्ध करू शकता का? असं कसं काय म्हणू शकतात? राज्यपालांनी एखादं सरकार पाडण्यात कधीच मदत करू नये. हे आपल्या लोकशाहीसाठी खूप गंभीर आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. 

"हे महाराष्ट्र राज्य आहे. सुसंस्कृत आणि विकसीत राज्य आहे. राजकारणात अनेक गोष्टी बोलल्या जातात. काहीवेळा अशाही गोष्टी बोलल्या जातात की ज्या अयोग्य असतात. हेही लक्षात घ्यायला हवं", असं सरन्यायाधीश म्हणाले. तीन वर्षांचा संसार एका रात्रीत कसा मोडलाजवळपास तीन वर्ष सारं व्यवस्थित सुरू होतं. मग एका रात्रीत तीन वर्षांचा संसार कसा काय मोडला? असा प्रश्न राज्यपालांना पडला पाहिजे होता, असंही डीवाय चंद्रचूड म्हणाले. पहिली गोष्ट म्हणजे हे सरकार कायदेशीररित्या निवडून आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपालांनी आपणच कायदेतज्ज्ञ आहोत असं वागू नये. घटनेतील १० व्या अनुसूचीचं उल्लंघन झालंय हे त्यांनीच ठरवू नये, असंही चंद्रचूड म्हणाले. 

राज्यपालांचं काय चुकलं तेही सांगितलंसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांचं नेमकं काय चुकलं हेही यावेळी नमूद केलं. "दोन महत्त्वाच्या गोष्टी राज्यपालांनी विचारात घेतल्या नाहीत. पहिली म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यात कोणतेही अंतर्गत मतभेद नव्हते. काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे ५३ सदस्य होते. हा आकडा ९७ इतका होतो. जो एक मोठा आकडा आहे. तर गडबडणारी गोष्ट म्हणजे शिवसेनेकडील ५६ पैकी ३४ आता वेगळी भूमिका घेत आहेत. दुसरी गोष्ट राज्यपालांनी लक्षात घेतली पाहिजे होती ती म्हणजे या तारखेपर्यंत शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन करणार आहे, अशी एकही सूचना मिळालेली नव्हती", असं सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना