- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्राला केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत १.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला. या कालावधीत उत्तर प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. २०२०–२१ मध्ये एकूण ३.८६ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४.१९ लाख कोटी रुपये झाला; मात्र २०२४-२५ मध्ये तो ३.६३ लाख कोटी रुपये इतका राहिला आहे.
महाराष्ट्राला किती मिळाला निधी (कोटींमध्ये) २०२०–२१ ४७,६०६ २०२१–२२ १६,७८५ २०२२–२३ २४,४४३ २०२३–२४ ३०,२९३ २०२४–२५ २७,९६८
केंद्राच्या मदतीने राबविली विकासकामेकेंद्र पुरस्कृत योजनांतील निधी वितरण हे संबंधित योजनेची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यांनी केलेली मागणी, यापूर्वी दिलेल्या निधीच्या उपयोग प्रमाणपत्रांची पूर्तता आणि राज्य हिश्श्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्याने अनेक विकासकामे राबविली गेल्याचे स्पष्ट होत असून, केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
Web Summary : Maharashtra secured ₹1.47 lakh crore from central schemes in five years, ranking third nationally after Uttar Pradesh and Delhi. Funds aided development projects, contingent on state's request and fund utilization.
Web Summary : महाराष्ट्र को पिछले पांच वर्षों में केंद्रीय योजनाओं के तहत 1.47 लाख करोड़ रुपये मिले, उत्तर प्रदेश और दिल्ली के बाद तीसरा स्थान प्राप्त हुआ। यह निधि विकास कार्यों में सहायक है।