शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Johnson Baby Powder: तुम्हीही मुलांना 'ही' पावडर लावता? मग थांबा! चाचणीत ठरली फेल अन् लायसन्सही झालंय रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:48 IST

जॉन्सन बेबी पावडर ( Johnson Baby Powder) बनवणारी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली-

जॉन्सन बेबी पावडर ( Johnson Baby Powder) बनवणारी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादकाच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे कंपनी आता महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री करू शकणार नाही. पावडरचे नमुने तपासले असता ते स्टँडर्ड क्वालिटीचे नसल्याचं निष्पन्न झालं आहे. जॉन्सन बेबी पावडरचे नमुने मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून घेण्यात आले होते. 

एफडीएनं जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जॉन्सन बेबी पावडरचा वापर नवजात बालकाच्या त्वचेला नुकसान पोहोचवणारं ठरू शकतं. एफडीएनं तातडीनं कंपनीला जॉन्सन बेबी पावडरचा स्टॉक बाजारातून परत घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनानं ड्रग्ज अँड अॅडमिनिस्ट्रेशन अॅक्ट १९४० नुसार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. यात कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई का केली जाऊ नये याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. 

लहानग्यांच्या त्वचेस ठरेल अपायकारकजॉन्सन ॲण्ड जॉन्सनची पावडर  प्रामुख्याने नवजात बाळांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. साठ्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे उत्पादनाचा सामू (पीएच) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय  होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक  जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही त्यामुळे संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा ‘जॉन्सन बेबी पावडर’ या  उत्पादनाचा परवाना १५ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. 

कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जॉन्सन अँड जॉन्सन जगभरातील आरोग्य तज्ञांच्या वैज्ञानिक विश्लेषणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यांच्या विश्लेषणानं पुष्टी केली की टॅल्क-आधारित जॉन्सनची बेबी पावडर सुरक्षित आहे. बेबी पावडरमध्ये एस्बेस्टोस नसून कर्करोग होत नाही, असा दावा कंपनीनं केला आहे.

भारतात मोठी मागणीअमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन दीर्घकाळापासून भारतात बेबी पावडरची विक्री करत आहे. कंपनीचे जॉन्सन बेबी पावडर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. बहुतेक घरांमध्ये लहान मुलांसाठी ही पावडर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतात, बेबी पावडर व्यतिरिक्त, कंपनी बेबी शॅम्पू, बेबी सोप आणि बेबी ऑइल देखील विकते आणि त्याला प्रचंड मागणी आहे.

टॅग्स :Healthआरोग्य