शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच; केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 07:34 IST

तरतुदींनुसारच निवडणुका होणार, प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली.  

मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदान प्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणूक पार पडली, असे आयोगाने म्हटले आहे. 

आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ६ कोटी ४० लाख ८७  हजार ५८८ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत दर तासाला सरासरी ५८ लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित १ कोटी १६ लाखाच्या तुलनेत केवळ ६५ लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. 

काँग्रेसला लेखी उत्तर निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला लेखी उत्तर दिले असून, ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे तरीही पुन्हा पुन्हा असे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

मतदार यादीसंदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही, असे आयोगाने म्हटले आहे. मतदार यादीसंदर्भात आयोगाने सांगितले की,  १९५० च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व १९६० च्या मतदार नोंदणी नियमांनुसार तयार केली जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि अंतिम यादी सर्व पक्षांना उपलब्ध यादी करून दिली जाते. याशिवाय, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ ९०  अपिले करण्यात आली, जी एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदविलेली नाही.

मतदान प्रक्रियेत १ लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर ९७३२५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सर्व पक्षांकडून १ लाख ३ हजार ७२७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते. त्यामध्ये काँग्रेसच्या २७ हजार ९९ बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादीसंदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून कायद्याचा अवमान करणारे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्र