शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:15 IST

मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ असून, तो यशस्वीरीत्या पार पडला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. १३ जानेवारीपासून सुमारे ४५ दिवस सुरू असलेल्या व ६६.३१ कोटी भाविक सहभागी झालेल्या महाकुंभ मेळ्याची बुधवारी सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, महाकुंभ मेळ्याच्या विशाल आयोजनाची तुलना नव्याने जागृत झालेल्या, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेल्या व मुक्तपणे श्वास घेणाऱ्या एखाद्या देशाशी करावीशी वाटते.

मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले. या महान धार्मिक सोहळ्याने भारताला मोठी ऊर्जा मिळाली आहे. महाकुंभासारखा भव्य सोहळा आयोजित करणे सोपे नसते. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनात सफाई कर्मचारी, पोलिस, बोट, वाहनचालक आदी सर्व लोकांनी समर्पण आणि सेवावृत्तीने सहभागी झाले. महाकुंभ मेळ्याचे आयोजन हा व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय बनला आहे. गंगा, यमुनासारख्या देशातील सर्वच नद्या स्वच्छ ठेवण्यासाठीही देशभरातील जनतेला या कुंभमेळ्याने प्रेरणा दिली आहे. 

‘वसुधैव कुटुंबकम’ची प्रचिती : योगी आदित्यनाथमहाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी मोदी यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे आभार मानले. अशा धार्मिक सोहळ्यांचे आयोजन पाठिंब्याच्या जोरावर करता येते. ‘वसुधैव कुटुंबकम’ची महाकुंभ मेळ्यातून प्रचिती मिळाली, असे ते म्हणाले.

‘महाकुंभसाठी १६ हजार रेल्वेगाड्या चालविल्या’रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, महाकुंभ मेळ्यासाठी १६,००० हून अधिक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. त्यातून ५ कोटी लोकांनी प्रयागराजपर्यंत प्रवास केला व महाकुंभात पवित्र स्नान करून परत गावी रवाना झाले. २०१९च्या  कुंभमेळ्यात सुमारे ४,००० रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNarendra Modiनरेंद्र मोदी