तुम्ही दिलीप कुमार यांचा हिंदी चित्रपट गंगा आणि जमुना पाहिला असेल. या चित्रपटात दोन जुळे भाऊ एका यात्रेत हरवतात. पण, पुढं काही महिन्यानंतर ते पुन्हा एकमेकांना भेटतात. अशा गोष्टी तुम्ही अनेक हिंदी चित्रपटात पाहिल्या असतील. कधी कधी मुलगा आईपासून हरवल्याचे दाखवले जाते. चित्रपटात ते पुन्हा एकमेकांना भेटल्याचं दिसतं. हे असं दृश्य चित्रपटात आपण अनेक वेळा पाहिलं आहे. पण, खऱ्या आयुष्यात अशा घटना कधीतरीच बघायला मिळतात. पण कधी कधी निसर्गाचा चमत्कार होतो किंवा तुम्ही त्याला योगायोग म्हणा, अशीच एक घटना प्रयागराजमधील कुंभमेळामध्ये घडली आहे. २७ वर्षापासून हरवलेला भाऊ पुन्हा सापडला आहे.
Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती", डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका
झारखंड येथील एक कुटुंब प्रयागराज येथे महाकुंभसाठी गेले होते. यावेळी त्यांचा एक नातेवाईक २७ वर्षापूर्वी हरवलेला सापडला. १९९८ मध्ये तो व्यक्ती त्या व्यक्तीचे नाव गंगासागर यादव असं आहे. २७ वर्षानंतर त्यांनी प्रयागराजमध्ये अघोरी सन्यासच्या रुपात नातेवाईकांनी पाहिले. आता तो व्यक्ती बाबा राजकुमार या नावाने ओळखले जातात. त्यांचे वय ६५ वर्षे आहे.
१९९८ मध्ये हरवले होते
१९९८ मध्ये गंगासागर झारखंड येथून पटना येथे गेले होते, यावेळी ते तिथून हरवले. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पण काहीच पत्ता लागत नव्हता. त्यांची पत्नी देवी यांनी आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला.
गंगासागर यांच्या भावाने दिलेली माहिती अशी, 'आम्ही आमच्या भावाचा सगळीकडू शोध घेतला. पण काही केल्याने त्याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेणे सोडले होते. पण काही दिवसापूर्वी आमच्या एका नातेवाईकाने कुंभमेळ्यात गंगासागरांसारखा दिसणारा एक साधू पाहिला. त्यांनी त्यांचा फोटो काढला आणि आम्हाला पाठवला. फोटो पाहिल्यानंतर, आम्ही लगेच त्याची बायको आणि तिच्या दोन्ही मुलांना घेऊन महाकुंभमध्ये पोहोचलो.
अघोरी बाबांनी वाराणसीचे संत असल्याचे सांगितले
आता मुरली यादव आणि त्यांचे कुटुंबीय त्या अघोरी बाबांना गंगासागर यादव म्हणून बोलवत आहेत. पण त्या बाबांनी या दाव्याला नकार दिला आहे. बाबांनी स्वतःला वाराणसीचे संत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की माझा आणि गंगासागर याचा काही संबंध नाही.
दरम्यान, आता कुटुंबाने ते गंगासागर असल्याचा दावा करत त्यांच्या शरीरावर काही खुणा असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कुटुंबाने कुंभमेळा प्रशासनाकडे मदत मागितली आहे. आणि बाबांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे.
यावर आता या कुटुंबाने सांगितले आहे की, आम्ही डीएनए चाचणी करणार आहे. यामुळे खरं काय आहे ते समोर येईल. जर चाचणीमध्ये आमचा दावा खोटा ठरला तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागणार आहे.