शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत; दंडाधिकाऱ्यांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:03 IST

जेएनयूमधील 'त्या' व्हिडीओंशी छेडछाड झाल्याची अहवालात माहिती

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. याबद्दलचा व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेला होता, असंदेखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण 25 पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे. न्यूज18 नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, जेएनयू प्रकरणात दोन व्हिडीओ समोर आले. यातील एक व्हिडीओ 9 फेब्रुवारीचा, तर दुसरा 11 फेब्रुवारीचा होता. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जेएनयूमधील कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, अशी माहिती दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आहे. यामध्ये जेएनयूच्या एन्ट्री रजिस्टरचा उल्लेख आहे. संबंधित वृत्तवाहिनीनं या संदर्भातील व्हिडीओ आदेश देऊनही दंडाधिकाऱ्यांना सोपवला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झालेल्या जेएनयूमधील व्हिडीओंची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. या व्हिडीओंचा वापर पोलिसांकडून पुरावा म्हणून करण्यात येईलच याची खात्री देता नाही, अशी माहिती अहवालात आहे. यावरुन दिल्ली उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. देशद्रोह म्हणजे नेमका काय असतो हे तुम्हाला कळतं का?, असा सवाल यावेळी न्यायमूर्ती प्रतिभा रानी यांनी दिल्ली पोलिसांना विचारला. जेएनयू प्रकरणात विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलिसांनी 12 फेब्रुवारीला अटक केली होती. त्याच्याविरोधात 124-अ (देशद्रोह) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 17 फेब्रुवारीपर्यंत तो पोलीस कोठडीत होता. त्यानंतर 2 मार्चपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.  

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारseditionदेशद्रोह