शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:50 IST

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे. मात्र त्या जागी असलेल्या मदरसा संकुलात आजही सहा इमारती उभ्या आहेत असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने उच्चप्रतीच्या उपग्रह छायाचित्रांच्या आधारे केला आहे.भारताच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे ४ मार्च रोजी अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्को येथील प्लॅनेट लॅब्ज या खाजगी कंपनीने उपग्रहाद्वारे त्या जागेची छायाचित्रे टिपली आहेत. बालाकोटमध्ये हल्ला झाला त्या ठिकाणची उपग्रहाद्वारे काढलेली उच्चप्रतीची छायाचित्रे आजवर सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. प्लॅनेट लॅब्जने उपग्रहाद्वारे या जागेची ७२ सेमी इतक्या जवळून छायाचित्रे काढली आहेत. रॉयटर्सने म्हटले आहे की, या जागेच्या एप्रिल महिन्यात व आता काढलेल्या छायाचित्रांत तेथील स्थितीत फारसा फरक पडल्याचे निदर्शनास आलेले नाही. बॉम्बहल्ल्यांमुळे मदरसा संकुलात असलेल्या इमारतींचे नुकसान झाले आहे, भिंती पडल्या आहेत, आजूबाजूची झाडे कोसळली आहेत अशा कोणत्याही खाणाखुणा या छायाचित्रांत आढळून आल्या नाहीत.>नुकसानाबाबत संभ्रम कायमबालाकोटमधील हल्ल्यात किती दहशतवादी मारले याबद्दल मोदी सरकारने मौन पाळले आहे. हा आकडा सांगण्यास भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनीही नकार दिला होता. मात्र या हल्ल्यात २५० दहशतवाद्यांना मारण्यात आले असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच केला. केंद्रातले काही मंत्री हा आकडा ३५० असल्याचे खासगीत सांगत होते. हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले, किती दहशतवाद्यांना मारले याचे पुरावे देण्याची मागणी ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. त्या साऱ्या गोंधळात आता रॉयटर्सच्या वृत्तामुळे आणखी भर पडली आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल